Sangli Bribe Case : जमीन नोंदीसाठी लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

कडेगाव येथे ‘एसीबी’ची कारवाई; खासगी व्यक्तीवरही गुन्हा
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on
Updated on

सांगली : हरकत नोंद सुनावणीचा निकाल बाजूने देऊन खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कडेगाव येथील मंडल अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित मंडल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

मनोहर धोंडिराम पाटील (वय ५०, रा. किसाननगर, ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे, तर राजेंद्र विष्णू पाटील (५२, रा. लाड वस्ती, राजापूर, ता. तासगाव) असे लाचेची मागणी करणाऱ्या खासगी व्यक्तीचे नाव आहे. तक्रारदाराच्या जमीन खरेदी दस्ताच्या नोंदीबाबत कडेगाव मंडल अधिकारी कार्यालयात हरकत नोंद सुनावणी सुरू होती. या प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देऊन नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी मनोहर पाटील याने पैशांची मागणी केली.

कार्यालयात काम करणाऱ्या राजेंद्र पाटील या खासगी व्यक्तीला भेटून लाचेची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. याबाबत तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले आणि सांगली ‘एसीबी’च्या पोलिस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण, अंमलदार धनंजय खाडे, अजित पाटील आणि सुदर्शन पाटील यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news