

मिरज : दोन्ही मुलांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेळगाव येथील भामट्याने एरंडोली (ता. मिरज) येथील एका मजुराची ३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सखाराम भाऊ मोरे (वय ५३) यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दि. ६ जून २०२४ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत वेळोवेळी एरंडोली येथे हा प्रकार घडला. बेळगाव येथील संजय भालेकर याने मोरे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या दोन्ही मुलांना नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. नोकरी मिळण्याच्या आशेने मोरे यांनी भालेकर याच्यावर विश्वास ठेवून त्याला ३ लाख ३० हजार रुपये दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही भालेकर याने मुलांना नोकरी लावली नाही. घेतलेली रक्कम परत न करता मोरे यांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संजय भालेकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.