Sangli molestation case: सांगलीत अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकास अटक

दोन दिवसापूर्वी मुलगी एकटीच घरी असताना संशयित तिच्या घरात घुसला आणि तिचा विनयभंग केला
molestation case
molestation casePudhari
Published on
Updated on

सांगली : घरात घुसून जबरदस्तीने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी संशयित फजल राजू खतीफ (वय 21, रा. डोंबारे गल्ली, भारतनगर) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी वारंवार नकार देत असतानाही संशयित फजल हा तिला वेळोवेळी भेटण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पीडितेला सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज पाठवून धमकी देऊन बोलण्यास भाग पाडले. दोन दिवसापूर्वी मुलगी एकटीच घरी असताना संशयित तिच्या घरात घुसला आणि तिचा विनयभंग केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news