Sangli News : ‘महांकाली’च्या १७ जागांसाठी ३७ उमेदवार मैदानात

सत्ताधारी आणि कारखाना बचाव कृती समिती आमने-सामने
Mahankali Sugar Factory
‘महांकाली’च्या १७ जागांसाठी ३७ उमेदवार मैदानात
Published on
Updated on

मळणगाव : श्री महांकाली सहकारी साखर कारखाना लि., राजारामबापूनगर कवठेमहांकाळच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. १७ जागांसाठी तब्बल ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी श्री महांकाली शेतकरी विकास पॅनल आणि महांकाली साखर कारखाना बचाव कृती समिती यांच्यात थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच धार येणार आहे.

दरम्यान, अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे तसेच कारखान्याचे संस्थापक पंडितराव जाधव यांचे पुत्र अशोकराव जाधव यांच्यासह समर्थकांनी अर्ज मागे घेतल्याने बचाव समितीला धक्का बसला आहे.

महांकाली सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक गेल्यावर्षी जाहीर झाली होती. ७ ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. काही कारणास्तव निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. शुक्रवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे आणि पुत्र शंतनू सगरे यांच्यासह तब्बल १९ उमेदवारी अर्जांवर महांकाली साखर कारखाना बचाव समितीच्यावतीने विक्रम लक्ष्मण कोळेकर यांनी हरकत घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दोन्ही बाजूंना बाजू मांडण्याची संधी दिली. त्यानंतर रात्री उशिरा विक्रम कोळेकर यांच्या हरकती फेटाळून सर्व १९ अर्ज वैध ठरविण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानुसार कोर्ट फी भरल्याचा पुरावा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर न केल्याने तब्बल १६ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामध्ये उत्पादक सभासद सर्वसाधारण मतदारसंघातील १४ आणि उत्पादक सभासद अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातील दोन अर्जांचा समावेश आहे.

शनिवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या निवडणुकीचे बिगुल प्रत्यक्षात वाजले आहे. १७ जागांसाठी ३७ उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढतीकडे महांकाली कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सर्वसाधारण मतदारसंघात सत्ताधारी गटाकडून एका आणि विरोधी कारखाना बचाव समिती गटाकडून दोघांनी बंडखोरी केली आहे. सत्ताधारी पॅनेलसमोर बचाव समितीचे आव्हान कितपत प्रभावी ठरते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जयसिंगराव शेंडगेंसह संस्थापकांच्या वारसांचे अर्ज मागे

शनिवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बचाव कृती समितीचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव धोंडिराम शेंडगे आणि कारखान्याचे संस्थापक पंडितराव जाधव यांचे पुत्र अशोक पंडितराव जाधव यांसह अनेकांनी निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान केली आहे. शनिवारी शामराव पांडुरंग इरळे, रमेश ज्ञानू भोसले, आदगोंडा रामू बंडगर, चंद्रकांत हरिचंद्र पाटील, बाळासाहेब रामचंद्र पाटील, सुरेश बापूसोा पाटील, भानुदास कृष्णा पाटील, संभाजी गजानन पाटील, भारत गोविंद माळी, प्रवीण संभाजी पवार, विजय पुंडलिक पाटील, आप्पासोा यशवंत पाटील, संजय अण्णा पाटील, गणपती शंकर शेटे, अशोक श्रीपती कोळेकर, किरण जीवन भोसले, शिवाजी गणपती सुपने, अशोक बाळाप्पा इरळी, रूद्रगौडा आप्पासाहेब पाटील, सुनीता अशोक कुनुरे, शशिकला बाळासोा पाटील, विजय लोकाप्पा माने, संभाजी गुंडा बजबळे, मल्हारी मारुती माळी, नूरमोहम्मद सालारसोा शिरोळकर, श्रीपाल आप्पा पाटील, बाजीराव बाळकृष्ण मोरे, पांडुरंग ज्ञानू कोळेकर, अविराजे पांडुरंगराव शिंदे, भोसले शिवाजी तुकाराम, अण्णासोा आप्पासोा कोळेकर, कोंडीबा बाबू घागरे, भानुदास मारुतीराव भोसले, रामचंद्र हरी पाटील, गेंड मल्हारी संगीता, लैलाबी आप्पासोा पारेकर, महादेव राजाराम कमलाकर, दिनकर भगवान जाधव, उषाताई विनायक माने यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

श्री महांकाली शेतकरी विकास पॅनेल

सर्वसाधारण गट : अनिता विजयकुमार सगरे, दीपक गणपतराव ओलेकर, जीवन वसंतराव भोसले, सुहास शिवाजीराव पाटील, सागर सूर्यकांत पाटील, मोहन निवृत्ती खोत, भीमराव विठ्ठल कोळेकर, प्रकाश पंडित पाटील-बंडगर, संभाजी सर्जेराव पवार, कुमार आप्पासाहेब पाटील, काशिलिंग शामराव कोळेकर, अरविंद सदाशिव स्वामी, दीपक अच्युतराव चव्हाण.

महिला गट : छाया पुंडलिक पाटील, अनुराधा गणपती सगरे.

अनुसूचित जाती/जमाती गट : निखिल संजय बनसोडे.

बिगर उत्पादक गट : शंतनू विजयकुमार सगरे.

महांकाली साखर कारखाना बचाव कृती समिती सर्वसाधारण गट : मिलिंद शिवपुत्र कोरे, बाळासाहेब शंकर खोत, गजानन शिवलिंग कोठावळे, बाबुगोंडा जनगोंडा पाटील, विक्रम लक्ष्मण कोळेकर, संभाजी पांडुरंग पाटोळे, आप्पासाहेब दत्तात्रय कोळेकर, विठ्ठल रामचंद्र माळी कोरे, बाळासाहेब बजरंग पाटील, राजेंद्र नामदेव पाटील, सूर्यकांत बापू घागरे, जगन्नाथ बिरू कोळेकर, आनंदा राजाराम चौगुले, संग्राम विलासराव भोसले, दिलीप आनंदराव ओलेकर.

महिला गट : कासाबाई आत्माराम बसवर, अश्विनी विक्रम कोळेकर.

अनुसूचित जाती/जमाती गट : अशोक अंकुश चंदनशिवे.

बिगर उत्पादक गट : सरिता रवींद्र गाडवे.

मतदारसंघनिहाय चित्र

* उत्पादक सभासद सर्वसाधारण मतदारसंघ : १३ जागांसाठी २९ उमेदवार

* उत्पादक सभासद महिला मतदारसंघ : २ जागांसाठी ४ उमेदवार

* उत्पादक सभासद अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ : १ जागेसाठी २ उमेदवार

* बिगर उत्पादक सभासद संस्थासहित मतदारसंघ : १ जागेसाठी २ उमेदवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news