सांगली, पुढारी वृत्तसेवा : पेठनाका येथून नेर्लेकडे जाणार्या रस्त्यावर जयहिंद धाब्यानजीक रस्त्याच्या डाव्या बाजूला अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्या ठार झाला.
याबाबत माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सचिन जाधव, सहायक वनसंरक्षक अजित साजणे यानी घटना स्थळी भेट दिली. दरम्यान, मृत बिबट्या मादी असून त्याचे वय ६ ते ८ इतके आहे. पशुवैद्यकीय अधिकारी मांडवकर यांनी पंचनामा करुन यांनी शवविच्छेदन केले.