Sangli leopard attack : धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप

कराडचा युवक जखमी ः दोघे बचावले
leopard attack
संंग्रहित फोटो
Published on
Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूर-बहे रस्त्यावर हुबलवाडीनजीक रविवारी रात्री बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ला केला. या हल्ल्यात कराड येथील एक युवक जखमी झाला असून, अन्य दोघे जण थोडक्यात बचावले आहेत. अथर्व संजय माने (वय 25, रा. मलकापूर, कराड) हा युवक जखमी झाला. तो कराड येथील सरकारी दवाखान्यात आहे.

रविवारी कराड येथील राजेंद्र माने ईश्वरपूर एमआयडीसीमध्ये कामानिमित्त आले होते. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास काम आटोपून पुतण्या अथर्व, सहकाऱ्यासह दुचाकीवरून बहेच्या दिशेने निघाले होते. हुबालवाडीजवळील मारुती मंदिराजवळ दुचाकी आली. त्यावेळी झुडपातून बिबट्या बाहेर आला. त्याने धावत्या दुचाकीवर झडप घातली. या हल्ल्यात अथर्व याच्या डाव्या पायाच्या घोट्याला बिबट्याचे नख लागून तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर बिबट्या पसार झाला. जखमी अथर्वला तत्काळ ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला पुढील उपचारासाठी कराड येथे दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news