Sangli News : सांगलीत वकिलाला घरात घुसून पक्षकारांची धक्काबुक्की

एनओसीसाठी धमकावल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

सांगली : विश्रामबाग परिसरातील गव्हर्न्मेंट कॉलनी येथे राहणाऱ्या एका वकिलाच्या घरात घुसून, त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वकीलपत्र नको असल्याकारणाने एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी पक्षकारांनी हा प्रकार केला. याप्रकरणी ॲड. उमेश श्रीकांत सहस्रबुद्धे (वय 53) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अशोक शंकर निकम-पाटील (वय 64, रा. शामरावनगर), भालचंद्र शंकर निकम-पाटील (62, रा. खणभाग), गोरखनाथ शंकर निकम-पाटील (60) व अनोळखी अशा चौघांवर गुन्हा दाखल आहे.

सहस्रबुद्धे हे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता संशयित चौघे त्यांच्या घरासमोर आले आणि त्यांनी सहस्रबुद्धे यांना घराबाहेर बोलावून घेतले. ‌‘आमच्या दाव्यात विनायक पाटील यांना घेण्याची आमची इच्छा नाही. ते तुमच्या जवळचे असल्याने आम्हाला तुमचे वकीलपत्र नको आहे, त्यामुळे तातडीने एनओसी द्या‌’, अशी मागणी करत संशयितांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, ‌‘तुम्हाला एनओसी देतो, तुम्ही बाहेर थांबा‌’, असे सांगून सहस्रबुद्धे घरात गेले. मात्र संशयित चौघेही त्यांच्यापाठोपाठ जबरदस्तीने घरात शिरले. सहस्रबुद्धे यांनी एनओसी फाईलवर सही करून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले असता, संशयितांनी पुन्हा शिवीगाळ करत ‌‘तुला दाखवतोच‌’, अशी धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादीनुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news