

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची शेतीकर्जाची जून 2025 अखेरची थकबाकी 489.57 कोटी रुपये आहे. हा एनपीए कमी करण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बँकेची 28 जूनअखेर 72 टक्के वसुली झाली आहे, अशी माहिती बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
वाघ म्हणाले, शेतीकर्जाच्या वसुलीसाठी जूनअखेर जास्तीत जास्त वसुलीसाठी बॅँकेने प्रयत्न केले. बॅँकेची जूनअखेर शेतीकर्जाची वसूलपात्र रक्कम 2 हजार 372 कोटी 23 लाख रुपये होती. यातील 489.57 कोटी थकबाकी आहे. 28 जूनअखेर शेतीकर्जाची एकूण 1 हजार 710 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यात 355.55 कोटींची थकबाकी, तर 1 हजार 355 कोटी चालू मागणीतील आहे. 28 जूनअखेर बॅँकेची एकूण तालुकानिहाय वसुली पुढीलप्रमाणे ः कडेगाव ः 160.24 कोटी, वाळवा ः 265.15 कोटी, खानापूर ः 104.89 कोटी, शिराळा ः 91.70 कोटी, आटपाडी ः 116.13 कोटी, कवठेमहांकाळ ः 162.52 कोटी, पलूस ः 130.71 कोटी, मिरज ः 237.73 कोटी, तासगाव ः 202.14 कोटी, जत ः 239.30 कोटी. बॅँकेने शेती कर्जाचा एनपीए कमी करण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.