Sangli crime : कुपवाडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून

देशी दारूच्या दुकानात हल्ला; दोन संशयित ताब्यात
Sangli crime news
कुपवाडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून
Published on
Updated on

कुपवाड : शहरातील बामणोली रस्त्यालगत असलेल्या देशी दारूच्या दुकानात तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आली. सचिन महादेव अपराध-माने (वय 23, रा. अवधूत कॉलनी, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर संशयित हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी रात्री उशिरा सुभाष वाघमोडे, सुनील दुधाळ या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सोमवारी सायंकाळी सचिन हा बामणोली रस्त्यावरील दारूच्या दुकानात बसला होता. यावेळी दोन संशयित तरुण तिथे आले. त्यांच्या हातात शस्त्रे होती. त्यांनी सचिनच्या डोक्यात शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले.

पोलिसांनी सचिन याचा मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक संजीव झाडे, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे, महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news