Sangli Fire Incident: कुपवाड येथील हळद मिलला आग

लाखोंचे नुकसान; सहा तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश
Sangli Fire Incident: कुपवाड येथील हळद मिलला आग
Published on
Updated on

कुपवाड : येथील औद्योगिक वसाहतीमधील कानडवाडी रस्त्यालगत असलेल्या मे. पटेल ब्रदर्स यांच्या हळद मिलला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत हळद, मशिनरी, साहित्य आणि इमारतीचे लाखों रुपयांचे नुकसान झाले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या आठ बंबांच्या साहाय्याने जवानांनी सहा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

मंगळवारी सकाळी मिलमधील हळदीच्या पोत्यांमधून धूर बाहेर येत असल्याचे एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. त्याने कंपनीचा विद्युत पुरवठा बंद करून घटनेची माहिती मालकांना दिली. माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसीचे सहा आणि महापालिकेचे दोन अशा एकूण आठ अग्निशमन वाहनांसह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुपवाड औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन अधिकारी शरद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन अधिकारी डी. जे. माने, जयवंत पवार, गणेश घोलप, बाबासाहेब वरेकर, रवी कुरणे यांच्यासह नऊ जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी अश्विनकुमार बुचडे आणि कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news