Sangli News : कुपवाडमधील एका हायस्कूलचे कार्यालय सील

महापालिकेची धडक कारवाई; 4 लाख 73 हजारांचा मालमत्ता कर थकीत
Sangli Municipal Election
Sangli Municipal Election Pudhari
Published on
Updated on

कुपवाड : शहरातील एका हायस्कूलची मालमत्ता कर थकबाकी 4 लाख 73 हजार 98 रुपये इतकी होती. महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध पुकारलेल्या कारवाईत शैक्षणिक संस्थेचे कार्यालय आणि स्टाफरूम सील केले असल्याची माहिती सहायक आयुक्त आकाश डोईफोडे, कर अधीक्षक मोहन कलगुटगी यांनी दिली.

महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार कुपवाड शहरातील एका हायस्कूलचे कार्यालय मालमत्ता कर थकबाकीपोटी महापालिका प्रशासनाने शनिवारी सायंकाळी सील केले. संबंधित संस्थेकडे 4 लाख 73 हजार 98 रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. सदर संस्थेला महापालिका प्रशासनाने यापूर्वी अनेकदा कर भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आयुक्त गांधी यांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला. पथकाने संस्थेचे कार्यालय आणि स्टाफरूम अधिकृतपणे सील केले.

सदरची कारवाई सुरू असताना काही शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. कार्यालय सील केल्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे आणि धनादेश पुस्तके आतच अडकली. यावर काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. कुलूप उघडण्यास भाग पाडले. सर्व कागदपत्रे बाहेर काढताच कार्यालय पुन्हा सील करण्यात आले. कारवाईवेळी पालक, विद्यार्थी तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची गर्दी जमली. कुपवाड मनपा कर अधीक्षक मोहन कलगुटगी यांनी आपल्या ठाम पद्धतीने कोणालाही न जुमानता कारवाई पूर्ण केली. कारवाईनंतर आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, शहरातील कोणत्याही मालमत्ता धारकाने, मग तो व्यावसायिक असो वा शैक्षणिक संस्था, कराची थकबाकी ठेवल्यास कारवाई अटळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news