Sangli News : कृष्णेच्या पात्रात होड्यांच्या शर्यतीचा थरार

तरुण मराठा बोट क्लब अजिंक्य; शौकिनांची गर्दी
Sangli News
कृष्णेच्या पात्रात होड्यांच्या शर्यतीचा थरार
Published on
Updated on

सांगली : येथील गावभागमधील संकल्प फाऊंडेशनच्यावतीने कृष्णा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचा थरार रविवारी पाहायला मिळाला. या स्पर्धेत सांगलीवाडीतील तरुण मराठा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये इचलकरंजी येथील वरद विनायक बोट क्लब व डिग्रज बोट क्लब, डिग्रजने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. यामध्ये एकूण ११ होड्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा पाहण्‍यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला, पुलावर शर्यत शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.

स्पर्धेचे उद्‌घाटन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याहस्ते, तर बक्षीस वितरण महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शेखर इनामदार, नीता केळकर, रावसाहेब पाटील, नगरसेवक युवराज बावडेकर, भारती दिगडे, केदार खाडिलकर, दरिबा बंडगर आदी उपस्थित होते. शांतिनाथ कर्वे यांनी स्वागत, तर डॉ. सुहास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन सचिन दडगे, संतोष पाटील, पांडुरंग पाटील, दीपक हरुगडे आदींनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news