Sangli News: कोल्हापूर रस्त्याचे मार्किंग 35 मीटरने

आयुक्तांकडून पाहणी : पाईपलाईन शिफ्टिंग; अतिक्रमणे हटविणार
Sangli News |
Sangli News: कोल्हापूर रस्त्याचे मार्किंग 35 मीटरनेPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : येथील शास्त्री चौक ते शंभरफूटी या दरम्यानच्या कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 35 मीटरप्रमाणे मार्किंग करण्याबाबतचे निर्देश आयुक्त सत्यम गांधी यांनी भूमिअभिलेख अधिकार्‍यांना दिले. रस्त्याच्या मार्किंगनुसार पाईपलाईन शिफ्टींग, गटार बांधकाम होणार आहे. त्यासाठी अतिक्रमणे हटवली जाणार आहेत.

महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुधवारी संयुक्त पाहणी करण्यात आली. आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, उपअभियंता निखिल पाटील, महापालिकेचे मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद उपस्थित होते.

शास्त्री चौक ते शंभरफूटी रस्त्याचे रुंदीकरण 30 मीटरने होणार की 35 मीटरने याबाबत वादंग उठले होते. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने 35 मीटर रुंदीप्रमाणे भूमीअधिगृहण केलेली आहे. सन 2016 मध्ये ही कार्यवाही झालेली आहे. त्यानुसार भूमीअभिलेख कार्यालयाने रस्त्याचे मार्किंग करून घ्यावे. मार्किंगनंतर पाईपलाईन शिफ्टिंग, गटार बांधकामाची कार्यवाही सुरू होणार आहे. दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या मार्गात येणारी अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला महापालिका सहकार्य करेल, असे सांगण्यात आले.

मार्किंगचे दगड गायब

नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले, रस्ता रुंदीकरणासाठी भूमीसंपादन केल्यानंतर मार्किंगचे मोठे दगड लावले होते. काही ठिकाणी ते अजून आहेत. चौपदरीकरणानंतर मात्र काहींनी मार्किंगचे दगड काढून अनधिकृतपणे बांधकाम केले आहे. त्यातीलच काहीजण आता विरोध करताना दिसत आहेत. मार्किंगनुसार रुंदीकरण व्हावे. कोल्हापूरच्या धर्तीवर शहराच्या प्रवेशद्वारात कमान उभारावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news