Water Crisis : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतीसाठी आवर्तन बंद

बेकायदेशीर उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलिस व जलसंपदाचे संयुक्‍त पथक करणार
Water Crisis
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतीसाठी आवर्तन बंद
Published on
Updated on

शिराळा : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी 'एल-निनो'च्या प्रभावामुळे पर्जन्यमान घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून वारणा धरणासह तालुक्यातील सर्व धरणातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी धरणांमधून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. धरणांमधून ५०० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. गतवर्षीपेक्षा २.२६ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

धरणे, जलाशय असतील आता केवळ आणि केवळ पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने कंबर कसली आहे.

पाणी टंचाईच्या काळात अनेक ठिकाणी धरणे, नद्या, कालवे आणि तलावांमधून बेकायदेशीर पाणी उपसा केला जातो. हा प्रकार रोखण्यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभागाचे 'संयुक्त पथक' तयार करण्यात येणार आहे. हे पथक जलस्रोतांवर गस्त घालणार असून अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप जप्त करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करणार आहे.

ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवण्यात येणार असल्याने, शेती आणि उद्योगांसाठी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, जेणेकरून भविष्यात कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही.
- बाबासाहेब पाटील उपविभागीय अभियंता वारणा धरण व्यवस्थापन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news