Sangli News| खिरवडे येथे शेळीवर बिबट्याचा हल्ला

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on: 
Updated on: 

कोकरुड : खिरवडे (ता. शिराळा) येथे रविवारी (दि. ४) दुपारी बिबट्याने शेळीवर अचानक हल्ला केला. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने बिबट्याने शेळी सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली आहे.

खिरवडे येथील शेतकरी तानाजी राघू पाटील हे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास जनावरे व शेळ्या घेऊन डोंगर पठारावरील शिवची ओघळ परिसरात चारण्यासाठी गेले होते. दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान शेळ्या चरत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एका शेळीवर झडप घातली. हल्ल्यात शेळी जखमी झाली.

बिबट्या शेळीला घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच तानाजी पाटील यांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने परिसरातील शेतकरी सीताराम पाटील (हत्तेगाव), साहिल पाटील, बाळू मस्कर, गोरख पाटील यांच्यासह इतर शेतकरी घटनास्थळी धावून आले. सर्वांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने शेळी सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news