Sangli News : खलाटी तलाव ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरणार

३० सप्टेंबरपर्यंत पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन
Sangli News : खलाटी तलाव ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरणार
Published on: 
Updated on: 

वळसंग : खलाटी (ता. जत) येथील तलाव म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने भरण्याची शेतकरी व ग्रामस्थांची मागणी अखेर जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतली आहे. खलाटी तलावासाठी अतिरिक्त लाईनमधून पाण्याचा विसर्ग उपलब्ध करून देण्यात येणार असून, ३० सप्टेंबरपर्यंत तलावात पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे म्हैसाळ बंधारा उपविभाग, जत यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावाजवळ कृष्णा नदीपात्रातून पाणी उचलून जत तालुक्यातील गावांना सिंचनासाठी पुरवले जाते. या विभागाच्या कार्यक्षेत्रात जत तालुक्यातील १९ गावांमधील सुमारे ३४ हजार ८४० हेक्टर सिंचन क्षेत्र येते. यंदा जत तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने म्हैसाळच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

देवनाळ कालवा विभाग क्रमांक २ व देवनाळ विस्तारित भाग मिळून सुमारे २४ किलोमीटर कालव्यावर बिळूर, खोजनवाडी, उमराणी, खलाटी, मेंढिगिरी, देवनाळ, उंटवाडी, मुचंडी, अमृतवाडी, शेड्याळ, वळसंग, पाच्छापूर व रावळगुंडवाडी या गावांचा समावेश आहे. या भागात १८ ऑगस्टपासून पाणी सुरू असून, सध्या अमृतवाडी, पाच्छापूर, शेड्याळ व वळसंग परिसरात आवर्तन सुरू आहे. मात्र खलाटी गावातील लाभक्षेत्राला अद्याप पाणी मिळालेले नव्हते.

प्रत्यक्ष पाणी पोहोचण्याकडे ग्रामस्थांचे लक्ष

खलाटी तलावासाठी पाण्याचा विसर्ग उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत खलाटी तलावात म्हैसाळचे पाणी पोहोचल्यास परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे दिलेल्या नियोजनानुसार ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात तलावात पाणी पोहोचते का, याकडे संपूर्ण खलाटी परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news