Kavathe Mahankal Crime : कवठेमहांकाळ तालुक्यात पिस्तुलांचा बाजार

महिन्यात तीन ठिकाणी कारवाई ः चार पिस्तूलसह काडतुसे जप्त; मुख्य सूत्रधाराचा सुगावा लागेना
Kavathe Mahankal Crime News
कवठेमहांकाळ तालुक्यात पिस्तुलांचा बाजार
Published on
Updated on

दिलीप जाधव

कवठेमहांकाळ : गेल्या महिनाभरात कवठेमहांकाळ तालुक्यात अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अवघ्या 25 दिवसांत पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये चार पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे तालुक्यात कशी पोहोचत आहेत? मुख्य रॅकेट कोणाचे आहे? याचा सुगावा पोलिसांना आतापर्यंत का लागला नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बोरगाव हद्दीतील कोड्याच्या माळावर कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचून प्रथमेश राजेश सकपाळ (रा. सांगली) याला रंगेहात पकडले. तो दोन देशी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. झडतीमध्ये दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, रोख रक्कम आणि सॅक, असा तब्बल 1 लाख 2 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शुक्रवार, दि. 8 मे रोजी अलकुड एस येथील रेल्वे फाटकाजवळील कालवा परिसरात पोलिसांनी गणपती पांडुरंग जानकर (रा.अलकुड एस, ता. कवठेमहांकाळ) याला देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह पकडले. या कारवाईत 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवार, दि. 9 मे रोजी कवठेमहांकाळ शहरातील स्वप्निल वसंत मोटे (रा. अलकुड एस) याला पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news