Kavathe Ekand bank fraud: जिल्हा बँकेच्या कवठेएकंद शाखेत अडीच लाखांचा अपहार

तत्कालीन कॅशियरविरोधात गुन्हा दाखल
 fraud
fraudpudhari photo
Published on
Updated on

तासगाव : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तत्कालीन कॅशियरने शेतकरी खातेदाराच्या नावे बँकेत जमा झालेली पीक विम्याची रक्कम परस्पर दुसऱ्याच्या नावे टाकून त्याची बनावट सही करून दोन लाख 58 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेचे अधिकारी प्रवीण अन्नू कोळी (रा. माहेश्वरी हॉलजवळ, विश्रामबाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

राहुल विलास वास्कर (रा. सांगली) असे तत्कालीन कॅशियर कम एजंटाचे नाव आहे. हा अपहार दि. 6 ते 8 नोव्हेंबर 2019 दरम्यान घडला. बँकेच्या तपासणीत हा अपहार समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संशयित राहुल हा अपहार काळात बँकेत कॅशियर व एजंट म्हणून कार्यरत होता. 2012-2013 मध्ये शासनाकडून शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली होती. संशयित राहुल वास्कर याने आपल्या पदाचा गैरवापर करून या खात्याच्या नावात बदल करून त्या खात्यास संदीप यशवंत गुरव असे नाव दिले.

संबंधित खात्यावर जमा झालेली पीक विम्याची शिल्लक रक्कम 2,58,217 रुपये संदीप यशवंत गुरव याच्या सेव्हिंग खात्यावर वर्ग केली. ही रक्कम संदीप गुरव यांच्या नावे धनादेशाने टाकली. बँकेची बनावट स्लिप बनवून त्यावर संदीप गुरव याची बनावट सही करून खात्यावरील रक्कम रोखीने काढून त्या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news