Sangli News : सांगलीत रंगला ‌‘कस्तुरी‌’चा हळदी-कुंकू सोहळा

समर्थ न्यूरो स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
Sangli News
सांगलीत रंगला ‌‘कस्तुरी‌’चा हळदी-कुंकू सोहळा
Published on
Updated on

सांगली : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दैनिक पुढारी कस्तुरी क्लबतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कस्तुरी सभासदांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. एकमेकींना हळदी-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या.

शनिवार, दि. 24 जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये श्री नारायणी ग्रुपने धमाकेदार डान्स सादर केला. अभय कुलकर्णी यांच्या ग्रुपची गाण्यांची मैफल दाद मिळवून गेली. उपस्थित महिलांना वाण वाटप करण्यात आले. शिवाय उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आले. महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमास समर्थ न्यूरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रायोजकत्व लाभले. समर्थ हॉस्पिटलच्या संचालिका बालरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.

‌‘आपलं एफएम 91.9‌’ च्या व्यवस्थापिका रत्ना पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमास ‌‘गजराज ज्वेलर्स‌’चे मयूर पाटील, ‌‘सरोवर मसाले‌’चे रोहित शहा, ‌‘सरस्वती चहा‌’च्या नम्रता बनतवाला आणि ‌‘आपलं एफएम‌’चे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रोहित मगदूम उपस्थित होते. यावेळी कस्तुरी ग्रुप लीडर पूजा जोशी, सविता पाटील, संगीता पाटील, सुरेखा सुतार, माणिक कुंभार, स्नेहा बिरनाळे, सरिता कोळी, सरोज वाडकर, स्वाती जाधव, राणी पाटील, संजना गंगथडे उपस्थित होत्या. सोनाली ओतारी यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news