

इस्लामपूर : दै. पुढारी कस्तुरी क्लब, इस्लामपूर यांच्यावतीने कस्तुरी स्नेहसंमेलन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कस्तुरी क्लबच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शनिवार, दि. 5 जुलैरोजी दुपारी 12 वाजता येथील यशोधननगरमधील यशोधन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या स्नेहसंमेलनात क्लबच्या सर्व मैत्रिणींना आपल्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मैत्रिणींना व्यासपीठावर येऊन आपले कौशल्य दाखवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा स्नेहसंमेलनाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मैत्रिणींना एक विशेष संधी दिली जात आहे. तसेच 7 कलर्स मिनाज दिवाण, मीरा शिंदे, तेजस्विनी सावंत यांच्या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाचा स्वादही घेता येणार आहे.
दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या 2025-26 ची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. यावर्षी 600 रुपयांमध्ये 1299 रुपयांचा बॉस कंपनीचा टिफीन मिळणार आहे. तसेच पहिल्या 500 मेंबर महिलांनी सभासद नोंदणी केली तर ‘वेदिका वन ग्रॅम’ यांच्याकडून फॅन्सी मंगळसूत्र मिळणार आहे. तसेच सर्व सभासदांना फॅन्शी बांगड्या मिळणार आहेत. महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कस्तुरी क्लब आयोजकांनी केले आहे.
5 जुलैरोजी यशोधन हॉलमध्ये होणार्या या कार्यक्रमाला सहभागी होण्यासाठी सभासद महिलांनी नावनोंदणी 4 जुलैरोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत इस्लामपूर विभागीय कार्यालय, येथे करावी. हा कार्यक्रम कस्तुरी सभासद व त्यांच्या मैत्रिणीसाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी मधु देसावळे - 8308706122