Sangli News : ‘होम मिनिस्टर‌’सोबत उद्या रंगणार ‌‘कस्तुरी‌’ची चैत्रगौर

लोकमान्य सोसायटी आणि पुढारी कस्तुरी क्लबतर्फे आयोजन
Pudhari Kasturi Club |
Pudhari Kasturi ClubPudhari File photo
Published on
Updated on

सांगली : चैत्रगौर पूजन, पैठणीचा खेळ आणि बक्षिसांची लयलूट होणार आहे. निमित्त आहे दैनिक पुढारी कस्तुरी क्लब आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी लिमिटेड यांच्या आयोजनातून मराठी नववर्ष आणि चैत्रगौर यांचे औचित्य साधून शनिवार दि. 28 मार्च रोजी दुपारी तीन वाजता भावे नाट्यगृह येथे होणारा ‌‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा‌’ कार्यक्रम.

हा कार्यक्रम होम मिनिस्टर फेम अस्मिता खटावकर यांच्या धमाकेदार सादरीकरणातून रंगणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचा कार्यक्रमात सहभाग असून ही संस्था 1995 मध्ये स्थापन झाली. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह दिल्ली या राज्यांमध्ये शेकडो शाखांद्वारे ती सेवा देत आहे. खास कर्तृत्ववान कस्तुरी सभासदांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास अशोक मिल यांचे सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news