Sangli Police Constable Death: कडेपूर येथे पोलिस शिपायाने गळफास घेत जीवन संपवले

कराड शहर पोलिस ठाण्यात होते कार्यरत
Sangli Police Constable Death: कडेपूर येथे पोलिस शिपायाने गळफास घेत जीवन संपवले
Published on
Updated on

कडेगाव शहर : कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथे कराड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या २५ वर्षीय तरुण पोलिस शिपायाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. आशुतोष अजित माने (रा. कडेपूर, ता. कडेगाव, जि. सांगली) असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. ते पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत होते. आपल्या शांत, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांची सहकाऱ्यांमध्ये चांगली ओळख होती.

मंगळवारी पहाटे आशुतोष माने यांनी घराजवळील जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना तातडीने कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून कडेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news