Sangli News : कडेगावमध्ये रिक्त पदांमुळे पशुवैद्यकीय सेवा सलाईनवर

डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा; केवळ 13 जणांवर तालुक्याची भिस्त
Veterinary Services
कडेगावमध्ये रिक्त पदांमुळे पशुवैद्यकीय सेवा सलाईनवर
Published on: 
Updated on: 

कडेगाव शहर : कडेगाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टर्स, पशुधन पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा असल्याने पशुवैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. एकूण 32 पदांपैकी तब्बल 19 पदे रिक्त असल्याने अनेक दवाखान्यांना टाळे लागलेले पाहायला मिळते. यामुळे तालुक्यातील सुमारे 81 हजार पशुधनावर उपचार करताना उपलब्ध 13 कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत असून, रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

सध्या तालुक्यात 55 हजार मोठी जनावरे (38 हजार म्हशी व 17 हजार गाई) आणि 25 हजार शेळ्या-मेंढ्या असे एकूण 81 हजार 168 पशुधन आहे. तरी देखील तालुक्यातील वांगी, चिंचणी, देवराष्ट्रे, कडेगाव, शाळगाव, नेवरी, कोतीज, सोनसळ आणि तोंडोली या दवाखान्यांत कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. उपचारासाठी जनावरे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अनेकदा माघारी फिरावे लागते. त्यांच्या वेळेचा व खर्चाचा अपव्यय होतो. वेळेत उपचार न मिळाल्यास साथीच्या आजारांमुळे जनावरे दगावण्याचीही भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news