Sangli Job Fraud : नोकरीच्या आमिषाने १० जणांना ६७ लाखाला गंडा

शिक्षक, लिपिक नोकरीचे आमिष; मुंबईतील सहाजणांवर सांगलीत गुन्हा
Job fraud case
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूकFile Photo
Published on
Updated on

सांगली : शिक्षक आणि लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १० जणांना ६७ लाख ३४ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील एका टोळीने संगनमत करून ही कोट्यवधींची फसवणूक केली असून, याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुंग (ता. मिरज) येथील निवृत्त शिक्षक सुरेश कृष्णा नवाळे (वय ६७) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे.

संशयित सुधाकर काशीनाथ फातर्पेकर, निकिता सुधाकर फातर्पेकर, दिशा संजय फातर्पेकर, कल्पेश प्रभाकर फातर्पेकर, कडू छबू चव्हाण आणि विलास (प्रिन्स) मिश्रा (सर्व रा. मुंबई) यांनी मे २०२१ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा गंडा घातला. मुंबईतील एका शिक्षण संस्थेत शिक्षक आणि लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे आमिष या टोळीने दाखविले. फिर्यादी नवाळे यांच्यासह त्यांच्या ओळखीच्या १० तरुणांना जाळ्यात ओढून संशयितांनी रोख व ऑनलाईन स्वरूपात एकूण ७१ लाख ८० हजार रुपये उकळले.

दीर्घ काळ उलटूनही नोकरी मिळत नसल्याने उमेदवारांनी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला. त्यावेळी संशयितांनी ७१ लाख ८० हजारांपैकी केवळ ४ लाख ४५ हजार रुपये परत देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उर्वरित ६७ लाख ३४ हजार रुपये परत न देता आणि कोणतीही नोकरी न लावता उमेदवारांची फसवणूक केली.

बनावट नियुक्तीपत्रे देऊन केली फसवणूक

तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी पालघर शिक्षण अधिकाऱ्यांच्या सहीची बनावट आदेशपत्रे तयार केली. तसेच तीन उमेदवारांना शिक्षण संस्थेची बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांची फसवणूक केली.​

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news