Sangli Crime: दागिने चोरीप्रकरणी सांगली येथील सुवर्णकाराला अटक

कुडाळ बसस्थानकावर २९ एप्रिल रोजी झालेल्या ७ तोळे सोन्याची चोरी प्रकरणाती संशयित नेहाल अहम्मद मेहमूद शेख याला कुडाळ पोलिसांनी सोमवारी अटक केली
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ बसस्थानकावर २९ एप्रिल रोजी झालेल्या ७ तोळे सोन्याची चोरी प्रकरणातील संशयित नेहाल अहम्मद मेहमूद शेख (३२, रा. सांगली) याला कुडाळ पोलिसांनी सोमवारी अटक केली. दागिने चोरीतील यापूर्वी ताब्यात घेतलेल्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

संशयित नेहाल शेख हा सुवर्णकार असून दागिने चोरलेल्या परजिल्ह्यातील महिलांनी हे दागिने त्याला विकल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिस नेहाल शेख याचा शोध घेत होते. मात्र, तो सांगली येथून पसार झाला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो कुडाळ पोलिस ठाण्यात हजर झाला.

याप्रकरणी सुप्रिया सचिन पेंडुरकर (३९, रा. मुंबई) यांनी तक्रार दिली होती. त्या पतीसह धार्मिक कार्यक्रमासाठी गावी येत होत्या. २९ एप्रिल २०२६ रोजी हे दाम्पत्य तेजस एक्सप्रेसमधून कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरले. त्यानंतर ते दोघे रिक्षाने कुडाळ बसस्थानक येथे आले. पुढे कट्टा मार्गे मालवणकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना असताना त्यांच्या पर्समधील ७ तोळ्याचे २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे लक्षात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news