Sangli robbery Case : उटगीत घरफोडी; शस्त्रधारी चोरट्यांचा धुमाकूळ

तरुणाच्या जागरूकतेने मोठा कट उधळला
Sangli robbery Case
उटगीत घरफोडी; शस्त्रधारी चोरट्यांचा धुमाकूळ
Published on
Updated on

जत शहर : तालुक्यातील उटगी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या शस्त्रधारी चोरट्यांनी घरफोडी करत दहशत माजविल्याची घटना उघडकीस आली. मात्र, एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी टळली. मध्यरात्री सहा जणांच्या शस्त्रधारी चोरट्यांच्या टोळीने गणपती मंदिर परिसरातील साबू गुरनिंगप्पा सुसलाद यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरमालक बाहेरगावी असल्याची संधी साधून त्यांनी लोखंडी कपाट व पेटी फोडत मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.

चोरीदरम्यान चोरट्यांच्या हातात काठ्या, तलवारीसारखी व कोयत्यासारखी धारदार शस्त्रे असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसून आले आहे. तसेच तोंडाला मास्क व रुमाल बांधून त्यांनी आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता.

विशेष म्हणजे, चोरी करताना या शस्त्रधारी टोळीने परिसरातील इतर घरांना बाहेरून कडी लावून नागरिक बाहेर पडू नयेत, याची खबरदारी घेतली. बॅटरीच्या उजेडात परिसराची रेकी करत त्यांनी पुढे चंद्रशेखर कत्ते यांच्या किराणा दुकानाकडे मोर्चा वळवला. दुकानाचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना आवाज ऐकून शेजारील सिद्राया हत्तरकी या तरुणाला संशय आला. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करत नागरिकांना जागे केले. त्यामुळे चोरट्यांची तारांबळ उडाली आणि ते दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणाची पोलिसांत अधिकृत नोंद झालेली नाही. घरमालक बाहेरगावी असल्याने नुकसानाचा नेमका अंदाज नाही. परिसरात पोलिस गस्त वाढवण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news