

जत; पुढारी वृत्तसेवा : जत शहरालगतच्या ताड मळा या ठिकाणी एक महिला फुगे व किरकोळ साहित्य विकत होती दरम्यान याच महिलेची काही लहान मुलांनी चेष्टा केली. यातूनच सदरची महिला मुले चोरणारी असल्याचा गैरसमज काहींचा झाला. या गैरसमजातून महिलेला झाडाला बांधून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडले आहे. याबाबत पोलिसात कोणताही गुन्हा दाखल नाही. सदरच्या महिलेला मारहाण केल्याचे व्हिडिओ मेसेज दिवसभर सोशल मीडिया द्वारे फिरत होते.
गुरुवारी सकाळी एक महिला फुगे व इतर किरकोळ साहित्य घेऊन एका वस्तीवर विकण्यास गेली होती. यावेळी मुलांनी त्या महिलेची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. महिलेने संबंधित लहान मुलांना हटकवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही महिला मुले पळवणारी असल्याचा गैरसमज त्या वस्तीवरील महिलांचा झाला. महिला एकत्रित जमा झाल्या. मुले चोरणारी महिला आहे. या गैरसमजातून महिलेला झाडाला बांधण्यात आले व मारहाण करण्यात आले. आमचे व्हिडिओ मेसेज तालुक्यात सर्वत्र सोशल मीडिया द्वारे पसरले होते. ही घटना जत पोलिसाना समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी हजर झाले. अधिक चौकशी केली व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या महिलेची अधिक चौकशी केली असता ही महिला शेगाव येथील असल्याचे समजले उदरनिर्वाहासाठी व किरकोळ साहित्य फिरून विकत असल्याची माहिती पोलिसांना खात्रीशीर झाल्याने महिलेला सोडून देण्यात आले. तालुक्यात अशा प्रकारची अफवा पसरवू नये कोणत्याही गोष्टीची खतरजमा केल्याशिवाय असं कोणतेही कृत्य करू नये तसेच अशी कोणती संशयित व्यक्ती दिसल्यास पोलीसाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोशल मीडियातून मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत आहे अशी अफवा पसरणारे मेसेज अथवा फोटो व्हायरल केले जात आहेत .जत पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तशी कोणतीही नोंद नाही. तरीही शाळा आणि पालकांनी सतर्क रहावे. शाळेत आलेल्या मुलांना न्यायला कोणी अनोळखी व्यक्ती अथवा महिला आल्यास संबंधित शाळेने संबंधित पालकांना कॉल करून खात्री करावी. मगच मुलांना त्यांच्याकडे सोपावावे. शाळा परिसरात संशयित व्यक्ती फिरत असल्यास तात्काळ पोलीस व पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करावा. संशयस्पद व्यक्ती आढळून येणाऱ्या व्यक्तीस मारहाण करू नये. त्यांची माहिती पोलीस ठाण्यास तात्काळ कळवावी अफवा पसरण्याद्वारे पसरणारे मेसेज फोटो व्हिडिओ व्हायरल करण्यात येऊ नये.
हेही वाचा