

जत : जत-सांगोला महामार्गावर विठ्ठलनगर येथील ज्योतिर्लिंग गॅरेजजवळ रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास वाहनाने धडक दिल्याने बापू शिवाजी वाघमोडे (वय 25 रा.विठ्ठलनगर, जत ) हा तरुण जागीच ठार झाला. वाहनचालक फरार झाला असून याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बापू वाघमोडे हे जत सांगोला महामार्गावरून चालत जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने उडविले. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी प्रवीण शिवाजी वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.