Sangli Drowning Incident : पोहताना कॅन सुटून 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

कृष्णा नदीच्या अमणापूर पात्रामधील घटना ः प्राथमिक तपास सुरू
Drowning Incident
पोहताना कॅन सुटून 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू Pudhari File Fhoto
Published on
Updated on

पलूस : पलूस तालुक्यातील आमणापूर हद्दीत दि. 6 मेरोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 10 वर्षीय मुलीचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला. आर्वी संभाजी सुतार (वय 10, रा. सुतार गल्ली, पलूस) असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कु. आर्वी सुतार ही सकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास नातेवाईक कुंदन हणमंत सुतार यांच्यासोबत आमणापूर परिसरातील कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेली होती. पोहत असताना तिने पाठीवर कॅन बांधलेला होता. मात्र, अचानक कॅन सुटल्याने ती पाण्यात बुडाली.

घटनेनंतर नातेवाईकांनी तिला तातडीने ग्रामीण रुग्णालय, पलूस येथे सकाळी 8.07 वाजता दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याबाबत डॉ. दिवटे यांनी पलूस पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. या घटनेची नोंद पलूस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे. मृताबाबतचा अहवाल तालुका कार्यकारी दंडाधिकारी, पलूस यांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news