Sangli News| लग्न होत नाही, विशेष अंगठी घाला..!

जतपूर्वमधील बुवाकडे लग्नाळू तरुणांची गर्दी; अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक
Fraud godmen
ढोंगी बाबाFile Photo
Published on
Updated on

जत शहर : जत तालुक्यात भोंदूगिरीचे प्रकार ग्रामीण भागात अधुनमधून समोर येत असतात. लग्न होत नसेल, तर मंतरलेली विशेष अंगठी घाला, असे आमिष दाखवून अनेक तरुणांना भुरळ पाडली जात आहे. एका अंगठीची किंमत चार हजार ठेवण्यात आली असून, त्याच्या दरबारात तरुणांची गर्दी होत आहे.

अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि भोंदू बाबांच्या नावाखाली असलेल्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत. लोकांच्या अंधश्रद्धा, आजारपण, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी बुवा, बाबा पुढे येत आहेत. कधी काली जादू, तर करणी घालणे, काढणे असे प्रकार केले जातात. पण यावर बोलायला वा तक्रार करायला कोणीही तयार नसल्याने भोंदूगिरीचे प्रकार वाढत आहेत.

जत तालुक्यातील विविध गावांमध्ये काही भोंदूबाबा, तांत्रिक आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती लोकांच्या अडचणींचा फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात आजार बरे करण्याचे, नोकरी लावण्याचे, लग्न होण्यासाठी तसेच कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून लोकांकडून हजारो रुपये उकळले जात आहे. गावोगावी रात्रीच्या वेळी गुप्त विधी, अंगारा-धूप करून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विशेषतः अशिक्षित व अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना लक्ष्य करून ही भोंदूगिरी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जत तालुक्यात अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि भोंदू बाबांच्या नावाखाली अशा फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

‘प्रेम‌’ मिळविण्यासाठी कर्नाटकी बुवाकडे ओघ

जत तालुक्यात आणखी एक फॅड वाढत आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याला काहीही करून आपलेसे करण्यासाठी मार्ग दाखविणारे बुवा निर्माण झालेले आहेत. हे बुवा कर्नाटकात बसून महाराष्ट्रातील ‌‘प्रेमप्रकरणे‌’ जुळविण्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे सीमाभागातील तरुण मंडळी प्रेमाच्या सुपाऱ्या घेऊन कर्नाटकातील या बुवाच्या दरबारात हजेरी लावत आहेत. आवडत्या मुलींचे फोटो घेऊन दरबारात जात आहेत. बुवाला तो मागेल तेवढे पैसे द्यायची तयारी केलेली असते. आता महाराष्ट्रातील पोलिस या ठिकाणच्या बुवांना पकडू शकत नाहीत, ते कर्नाटकात जाऊन काय पकडणार, असा सवाल विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news