Sangli News : गुंतवणुकीच्या आमिषाने ५६ लाखांचा गंडा

पाच्छापूरच्या तरुणाची ऑनलाईन फसवणूक; जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
financial scam |
financial scam |Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

जत : विमा कंपनीतील आकर्षक गुंतवणूक आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पाच्छापूर (ता. जत) येथील २२ वर्षीय तरुणाची तब्बल ५६ लाख ५५ हजार ३७३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उमेश रमेश कोळी यांनी जत पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच्छापूर येथील उमेश रमेश कोळी यांच्याशी संशयितांनी मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधला. विमा कंपनीच्या विविध आकर्षक गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास भरगोस आर्थिक परतावा मिळेल, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. भुरळ पाडणाऱ्या या आश्वासनांवर विश्वास ठेवून उमेश कोळी यांनी वेळोवेळी स्वतःच्या तसेच वडिलांच्या बँक खात्यातून आणि ऑनलाइन माध्यमांद्वारे संशयितांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर पैसे वर्ग केले.

मोठ्या परताव्याच्या अपेक्षेने तरुणाने हळूहळू करून तब्बल साडेपन्नास लाखांहून अधिक रक्कम गुंतवली. मात्र, मुदत संपल्यानंतरही आरोपींकडून कोणताच परतावा मिळाला नाही आणि गुंतवलेली मूळ रक्कमही परत मिळाली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोळी यांनी जत पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.