Sangli Crime : डफळापुरात गांजा लागवड; १.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नशामुक्त अभियानांतर्गत जत पोलिसांची कारवाई; एकास अटक
Cannabis Cultivation
डफळापुरात गांजा लागवडFile Photo
Published on
Updated on

जत : डफळापूर (ता. जत) येथे घराच्या भिंतीच्या आडोशाला अवैधरित्या गांजाची लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकून ७ किलो ८९७ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. या गांजाची किंमत १ लाख ५७ हजार ९४० रुपये होत आहे. याप्रकरणी बन्सीलाल श्रीपती वाघमारे (वय ६१) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी केली. पोलिसांनी संशयित वाघमारे यास अटक केली आहे.

पोलिस कॉन्स्टेबल नाथा खोत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, डफळापूर येथील बन्सीलाल याने त्याच्या घरालगत भिंतीच्या आडोशाला विनापरवाना गांजाची लागवड केली आहे. पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने छापा टाकला. छाप्यामध्ये घराशेजारी गांजाची झाडे लावून त्यांची जोपासना केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गांजाची ४ ते ५ फूट उंचीची झाडे जप्त केली. झाडांचे तुकडे करून दोन पोत्यांत भरल्यानंतर त्यांचे वजन केले असता एकूण ७ किलो ८९७ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत १ लाख ५७ हजार ९४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात नोंद आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर पोटे यांच्यासह जत पोलिस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर पोटे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news