Sangli ST Employee Death: जत येथे ५० वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

डोक्याला मार लागून रक्तस्राव; तपास सुरू
Sangli ST Employee Death: जत येथे ५० वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
Pudhari
Published on
Updated on

जत : जत शहरातील बाळगोपाल रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात ५० वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला ही घटना मंगळवार, दि. ८ सप्टेंबररोजी उघडकीस आली. बाळासाहेब तुकाराम माने (वय ५०, रा. बाळगोपाल रुग्णालयामागे, जत) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब माने हे जत-वळसंग मार्गावरील बाळगोपाल रुग्णालयाच्या पाठीमागे राहत होते. ते मिरज एसटी डेपोत मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी दुपारी १२:५० च्या सुमारास ते राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडलेले आढळून आले.

हा प्रकार लक्षात येताचा शहाजी अण्णाप्पा खांडेकर यांनी त्यांना तातडीने जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. निशांत सय्यद यांनी जत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माने यांच्या डोक्याला नेमका कशामुळे मार लागला, अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू कसा झाला, तसेच या घटनेमागे घातपात आहे का, या दिशेने पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिस म्हणतात...

जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे म्हणाले, मृत बाळासाहेब माने यांना यापूर्वी अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका आला होता. घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते. घरातच पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. या अवस्थेतही ते सुमारे दोन तास घरातच फिरल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. त्यासंदर्भात काही व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली आहे. कोणत्याही महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले नाही; घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news