Sangli Crime : ईश्वरपूरमध्ये तरुणीवर अत्याचार; सहाजणांवर गुन्हा

अत्याचार, व्हिडिओ व फोटो काढून ब्लॅकमेल करणे, तसेच जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Girl Assaut
Girl AssautPudhari
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणे, त्याचे नको असलेले व्हिडिओ व फोटो काढून ब्लॅकमेल करणे, तसेच जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ ऑगस्ट ते १७ ऑक्टोबर या कालावधीत घडला.

अमृता आनंदा महाबळ, अक्षय आनंदा महाबळ, माणिक पेठकर (पूर्ण पत्ता माहिती नाही), कल्पना माणिक पेठकर, अनिता कांबळे आणि रेश्मा गायकवाड (पूर्ण पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे असून, पीडित तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ८ ऑगस्ट २०२६ रोजी संशयित अमृता महाबळ हिने पीडित तरुणीला तिचा भाऊ अक्षय महाबळ याच्यासोबत एका लॉजवर पाठवले. तिथे अक्षय याने तरुणीस मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आणि त्याचे फोटो व व्हिडिओ काढून ठेवले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात माणिक पेठकर यानेही तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या आजीच्या घरी असताना, संशयित कल्पना पेठकर व अमृता महाबळ यांनी तिला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच अनिता कांबळे आणि रेश्मा गायकवाड यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या प्रकारामुळे मानसिक धक्क बसलेल्या पीडित तरुणीने तात्काळ ईश्वरपूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन न्याय मागितला. पोलिसांनी याप्रकरणी सर्व संशयितांविरोधात बलात्कार, मारहाण, धमकी देणे या कलमांसह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news