Ishwarpur leopard: ईश्वरपुरात बिबट्याचा सहा तास धुमाकूळ

नागरी वस्तीत घुसला; वन विभागाने अखेर बेशुद्ध करून पकडले
Ishwarpur leopard: ईश्वरपुरात बिबट्याचा सहा तास धुमाकूळ
Published on
Updated on

ईश्वरपूर : येथील उरूण परिसरात सोमवारी सकाळी नागरी वस्तीत भरदिवसा बिबट्या घुसला. त्यामुळे खळबळ उडाली होती. वन विभागाच्या पथकाने सहा तासांच्या प्रयत्नांनंतर अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाच्या या मादी बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून जेरबंद केले.

माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या जुन्या घरात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काहींना बिबट्या दिसला. बघता-बघता ही माहिती शहरभर पसरली. त्यामुळे गर्दी आणि गोंगाट वाढल्यामुळे हा बिबट्या घरामागे महादेव मंदिराच्या परिसरात, पडिक जागेत झुडपात लपून बसला. त्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळा लावला; मात्र गोंगाटात अडथळे येत होते. काही वेळा बिबट्या झुडपातून बाहेर आला होता. मात्र, लोकांची गर्दी पाहून तो पुन्हा लपून बसत होता.

काही वेळानंतर हा बिबट्या राजेंद्र पाटील यांच्या घराच्या तळमजल्यात घुसला. त्यावेळी वन विभागाच्या पथकाने संरक्षक किट घालून आणि जाळे टाकून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या जाळ्यातून बिबट्याने दोन वेळा पलायन केले. या झटापटीत वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला तार लागून दुखापत झाली. बिबट्या पुन्हा नागरी वस्तीत घुसण्याची भीती होती, त्यामुळे वन विभागाने या घराचा तळमजला जाळी लावून बंद केला. तळमजल्यात चारचाकी वाहनाखाली बिबट्या लपून बसला होता. अखेर त्याला इंजेक्शन देऊन पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news