Sangli Financial Fraud: ईश्वरपुरात फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा १५ लाखांचा अपहार

तिघा विरोधात गुन्हा ; व्यवस्थापकाची पोलिसांत फिर्याद
financial scam |
financial scam |Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : महिला बचत गटांच्या कर्जदारांकडून गोळा केलेले लघुकर्जाचे हप्ते बँकेत जमा न करता तब्बल १४ लाख ९२ हजार ५३३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांवर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय लक्ष्मण गोरे (रा. विरवडे शिरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), शिवम मोहन कोकणे (रा. शास्त्रीनगर, ईश्वरपूर) आणि वर्धमान महादेव नरळे (रा. लक्ष्मीनगर, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी इंडसइंड बँक/भारत फायनान्शियलच्या ईश्वरपूर शाखेचे व्यवस्थापक उदयसिंह रमेश क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. अपहाराचा हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते एप्रिल २०२५ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत फायनान्शियलच्या ईश्वरपूर शाखेतून परिसरातील महिला बचत गटांना कर्जपुरवठा केला जातो. कर्जदारांकडून दर आठवड्याला कर्जाचे हप्ते वसूल करून ते बँकेत जमा करण्याची जबाबदारी या फिल्ड असिस्टंट कर्मचाऱ्यांवर होती.

दरम्यान, कंपनीच्या लेखापरीक्षणामध्ये ३ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत कर्जदारांकडून वसूल केलेल्या रकमा शाखेत जमा झाल्या नसल्याचे निदर्शनास आले. कंपनीने केलेल्या चौकशीत संशयित दत्तात्रय गोरे याने ५७ महिला सदस्यांकडून ९ लाख २२ हजार ५६१ रुपये, शिवम कोकणे याने ६ महिला सदस्यांकडून ६७ हजार ७३९ रुपये, तर वर्धमान नरळे याने २४ महिला सदस्यांकडून ५ लाख २ हजार २३३ रुपये असे एकूण ८७ महिला कर्जदारांचे १४ लाख ९२ हजार ५३३ रुपये उकळून बँकेत जमा न करता स्वतःसाठी वापरल्याचे उघडकीस आले. कंपनीकडून ऑडिट रिपोर्ट, चौकशीतील जबाब आणि लोन लेजर पोलिसांकडे सोपवण्यात आले असून, याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विभावरी रेळेकर अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news