Sangli News : खासगी कंपनीचे दूरसंचार खांब पदपथावर, रस्त्यावर

वाहतुकीला अडथळा : खांब उभारताना मनमानी; आंदोलनाचा इशारा
Sangli News
खासगी कंपनीचे दूरसंचार खांब पदपथावर, रस्त्यावर
Published on
Updated on

सांगली : शहरात एका खासगी कंपनीने दूरसंचार सेवेचे पोल फूटपाथ, रस्त्यावर उभारलेले आहेत. त्याचा वाहतुकीला अडथळा होत आहे. हे पोल मनमानीपणे उभारले आहेत. पोल उभारणीस संबंधित यंत्रणेची परवानगी घेतली का?, कोणत्या अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली, या सर्व बाबींची चौकशी करावी. हे पोल रस्त्याकडेला स्थलांतरित करण्याचे आदेश कंपनीला द्यावेत, अशी मागणी होत आहे.

शहरात अनेक ठिकाणी एका खासगी कंपनीने दूरसंचार सेवेसाठी पोल उभारलेले आहेत. हे पोल उभारताना नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. शहरातील सुमारे 70 ते 80 टक्के पोल हे फूटपाथवर, तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी आडवे-तिडवे आणि बेकायदेशीर पद्धतीने उभारण्यात आले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. अपघाताचा धोका वाढला आहे. जिथे जागा मिळेल तिथे पोल उभारण्याची पद्धत अवलंबली गेली आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करून अडथळा ठरणारे सर्व पोल योग्य आणि सुरक्षित ठिकाणी हलवावेत, अशी मागणी नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली आहे.

नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले, वायफायचे पोल उभारण्यास परवानगी देताना नियम, अटी आणि शर्ती यांची पारदर्शक माहिती संबंधित यंत्रणेने नागरिकांसमोर मांडावी. फूटपाथ व रस्त्यावर अडथळा ठरणारे पोल स्थलांतरित करावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news