सांगली : विटा-मायणी रस्त्यावरील अपघातात पतीचा मृत्यू; पत्नी जखमी | Sangli Accident

सांगली : विटा-मायणी रस्त्यावरील अपघातात पतीचा मृत्यू; पत्नी जखमी | Sangli Accident

विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा ते मायणी रस्त्यावर घानवडजवळ चार चाकी आणि दुचाकीच्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली. हणमंत वसंत सकट (वय ५९, रा. पाचवड,जि. सातारा) असे मृत पतीचे नाव असून ते दुचाकी चालवीत होते. तर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी सुनंदा सकट (वय ५७) या जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज (दि. ११ ) मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील ईश्वर पवार हे आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी चारचाकी गाडीतून हिंगणगादे येथून घानवड मार्गे विट्याकडे येत होते. तर सातारा जिल्ह्यातील पाचवड येथील हणमंत वसंत सकट आणि त्यांची पत्नी सुनंदा हणमंत सकट दुचाकीवरून विट्याकडून मायणीमार्गे सातारा जिल्ह्यातील पाचवडकडे निघाले होते. घानवड येथील शाळेसमोर आल्यानंतर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील हणमंत सकट यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी सुनंदा सकट गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी सुनंदा सकट यांना विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीसह चारचाकीच्या समोरील बाजूचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news