Sangli News : ‘पीएनजी’ महाकरंडक एकांकिका स्पर्धा प्रवेश प्रक्रियेतच चुरस

मुदतीआधीच सर्व प्रवेशिका पूर्ण; २० आणि २१ सप्टेंबरला विष्णुदास भावे नाट्यगृहात थरार
Sangli News
‘पीएनजी’ महाकरंडक एकांकिका स्पर्धा प्रवेश प्रक्रियेतच चुरस
Published on
Updated on

सांगली : मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स प्रायोजित व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (सांगली शाखा) आयोजित ‘आठवी पीएनजी महाकरंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा’ यंदा प्रारंभापासूनच विशेष चर्चेत आली आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या तब्बल एक आठवडा आधीच अपेक्षित असलेल्या सर्व २० प्रवेशिका दाखल झाल्या असून, स्पर्धेत सुरुवातीपासूनच मोठी चुरस निर्माण झाली आहे.

ही राज्यस्तरीय स्पर्धा येत्या २० आणि २१ सप्टेंबर रोजी सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात रंगणार असून नाट्यरसिकांना एकांकिकांचा महासंग्राम पाहण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धा समिती प्रमुख प्रशांत गोखले यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकारी अंजली भिडे, विशाल कुलकर्णी, अपर्णा गोसावी, प्रशांत जगताप तसेच कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास जरंडीकर, सचिन पारेख, मकरंद कुलकर्णी, संजय कोटणीस, कुलदीप देवकुळे, शशांक लिमये आणि अनिरुद्ध जेरे हे विविध समित्यांची प्रमुख जबाबदारी सांभाळत आहेत.

या स्पर्धेत विजेत्यांसाठी एकूण ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. मानाचा फिरता ‘पीएनजी महाकरंडक’ यंदा कोणती महाविद्यालयीन टीम पटकावणार, याबाबत नाट्यरसकांत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news