Unseasonal Rain Sangli| सांगली जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करू : पालकमंत्र्यांचे आश्वासन

खानापूर, आटपाडी परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
 Crop Loss Compensation Sangli
विटा : सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देताना वैभव पाटील सोबत आम दार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, चिमण डांगे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक आणि विलास काळेबाग.Pudhari
Published on
Updated on

Crop Loss Compensation Sangli

विटा : सांगली जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आणि जास्तीत जास्त मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याची माहिती भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली.

गुरूवारी (दि.१९) खानापूर घाटमाथ्यावर सोसाट्याचा वारा व गारपीट होऊन खानापूर आटपाडी परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याबाबत आज शुक्रवारी भाजप नेते वैभव पाटील यांनी खानापूर घाटमाथ्यावरील शेतक ऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली आणि संबंधितांना धीर दिला.

 Crop Loss Compensation Sangli
Sangli News : जत तालुक्यात तलावातील पाणीसाठा घटला

यानंतर सांगली येथे जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख,चिमण डांगे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक आणि विलास काळेबाग उपस्थित होते. यावेळी वैभव पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना खानापूर तालुक्यात झालेल्या गारगपेटी बाबत सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले, शेतकऱ्यांनी आपला जीव मारून कष्टाने द्राक्ष बागा या परिसरात फुलविल्या आहेत. परंतु निसर्गाने हाता तोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांनी पाहिले ल्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा जीवापाड जपल्या होत्या. लाखो रुपयांचे कर्ज काढून खते औषधांवर खर्च करून पीक पिकवले.परंतु या निसर्गराजा ने अवकाळी च्या पावसाने आभाळा पेक्षा मोठे संकट त्यांच्यावर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

 Crop Loss Compensation Sangli
Sangli News : महापालिकेचा 1065 कोटींचा अर्थसंकल्प ‌‘स्थायी‌’कडे सादर

शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नुकसानग्रस्त गावातील पळशी हिवरे करंजे सुलतानगादे कुसबावडे तसेच आटपाडी तालुक्यातील झरे विभूतवाडी परिसरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानीचे शासन स्तरावर लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश देऊन या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी तसेच या पिका साठी काढलेले शेती कर्ज माफ व्हावे, अशी मागणी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी आपण जास्तीत जास्त मदत करण्यासंदर्भात शासन स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन आपल्या ला दिल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news