.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मिरज : बेडग (ता. मिरज) येथील द्राक्ष बागायतदाराला तब्बल 11 लाख 28 हजार 752 रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दीपक शंकर ओमासे यांनी धनाजी गौतम धायगुडे (रा. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दीपक ओमासे हे बेडगमधील द्राक्ष बागायतदार आहेत. धनाजी धायगुडे या व्यापाऱ्याने त्यांच्याकडून 18 लाख 68 हजार 752 रुपयांची द्राक्षे नेली होती. त्यापैकी 7 लाख 40 हजार रुपये त्याने ओमासे यांना दिले होते. त्याच्याकडून 11 लाख 28 हजार 752 रुपये येणे बाकी होते. ओमासे यांनी धायगुडे याच्याकडे वारंवार रकमेची मागणी केली, परंतु त्याने रक्कम न देता टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच ओमासे यांनी धायगुडे याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.