Sangli News : संचालक काशीनाथ नांगरेला अटक; १० तारखेपर्यंत पोलिस कोठडी

गोटखिंडीतील ‘केतनराज ॲकॅडमी’तील अत्याचार प्रकरण; पत्नी फरार
Sangli News
संचालक काशीनाथ नांगरेला अटक; १० तारखेपर्यंत पोलिस कोठडी
Published on
Updated on

​आष्टा : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील ‘केतनराज स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी’मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार व विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी संचालक काशीनाथ रामचंद्र नांगरे याला आष्टा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ईश्वरपूर येथील न्यायालयात हजर केले असता १० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश मिळाला. त्याची पत्नी मनीषा फरारी झाली आहे.

ॲकॅडमीत निवासी शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा संचालक काशीनाथने ११ जून २०२६ पासून वारंवार मानसिक छळ करत त्यांच्यावर अत्याचार व विनयभंग केला आहे. ‘शिक्षक दिना’दिवशी गुरुदक्षिणेच्या नावाखाली मुलींवर अत्याचार करण्यात आला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी त्याची पत्नी मनीषा हिने दिली होती.

पीडित मुलींनी पालकांना ही माहिती दिल्यानंतर संतप्त पालकांनी आरोपीला बेदम चोप दिला. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ कायदा व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news