Sangli Gold Market : सोन्या-चांदीची विक्री थांबली; केवळ बुकिंग सुरू

पुन्हा नवा विक्रम; दिवसात चांदी 22 हजारांनी महागली, सोने दीड लाखापार
Sangli Gold Market
सोन्या-चांदीची विक्री थांबली; केवळ बुकिंग सुरू
Published on
Updated on

सांगली : चांदीच्या दराने मंगळवारी पुन्हा नवा विक्रम केला. चांदीचा दर जीएसटीसह 3 लाख 24 हजार 450 रुपये झाला, तर सोन्याचा दरही मंगळवारी 1 लाख 52 हजार 955 रुपयांवर पोहोचला. एका दिवसात चांदीच्या दरात पुन्हा तब्बल 19 हजार 261 रुपयांनी, तर सोन्याच्या दरात 3 हजार 914 रुपयांनी वाढ झाली. सात महिन्यांत चांदीच्या दरात तिपटीने वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात भरमसाट वाढ होत असल्यामुळे सांगलीच्या सराफांनी विक्री पूर्ण बंद ठेवली आहे, तर काहीजण केवळ बुकिंग घेत आहेत.

सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरता चार महिन्यांपासून कायम आहे. आठ दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात रोज नवा विक्रम होत आहे. महिन्याभरात चांदीचा दर तब्बल एक लाखाहून अधिक रुपयांनी, तर सोन्याचा दर सहा हजार रुपयांनी वाढला आहे. सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांचा प्रतिसाद थंडावला आहे. चांदीच्या दरात वेगाने होत असलेल्या वाढीमुळे सराफ कट्ट्यावरील सोन्या-चांदीची विक्री मंगळवारपासून थांबविण्यात आली आहे. काही सराफांनी फक्त बुकिंग सुरू केले आहे. सोन्या-चांदीची आवक झाल्यानंतर त्यांचा ग्राहकांना पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुकिंगनंतर आठ दिवसांनी चांदी देण्यात येणार आहे. अलीकडील काळात पहिल्यांदाच तुटवड्यामुळे बुकिंग करण्याची वेळ आली आहे.

चांदीचा दर आता सव्वातीन लाखाच्या घरात पोहोचला आहे. सोन्याचा दरही वाढत आहे. सोन्या-चांदीच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना मागणीसाठी बुकिंग करावे लागत आहे. अर्थात बुकिंग दिवसाचा दर प्रत्यक्षात वितरित करताना आकारण्यात येत आहे. काही ठिकाणी सराफांनी विक्रीच बंद ठेवली आहे. आगामी काळात सोन्या-चांदीच्या दराबाबत काही सांगणे शक्य नाही.
सावकार शिराळे, सचिव, सांगली जिल्हा सराफ समिती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news