Sangli : सोन्याच्या दरवाढीमुळे ग्राहक 14-18 कॅरेटकडे वळले!

बाजारपेठेतील चित्र; तीन महिन्यांत सोने 22, तर चांदी 50 टक्क्यांनी महाग
Gold Rate
सोन्याच्या दरवाढीमुळे ग्राहक 14-18 कॅरेटकडे वळले!Pudhari File Photo
Published on
Updated on

अंजर अथणीकर

सांगली : सोन्या-चांदीच्या दरात तीन महिन्यांपासून झपाट्याने वाढ होत आहे. या कालावधीत सोन्याचा दर 22, तर चांदीचा दर तब्बल 50 टक्क्यांनी वाढला. सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहक परवडणार्‍या 18-14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांकडे वळत आहेत.अशा प्रकारच्या दागिन्यांना मागणी वाढल्याने सांगलीच्या बाजारपेठेत त्याची उपलब्धीही वाढली आहे. दरातील सततच्या बदलामुळे ग्राहक मागणीच्या 50 टक्के वजनाचेच दागिने खरेदीला पसंती देत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अगदी मिनिटा-मिनिटाला बदलणार्‍या दरामुळे सराफ पेढ्यांमध्येही दराची ऑनलाईन खातरजमा केली जाते. त्यानुसार सोने, चांदीच्या दरात तासा-तासाला बदल केले जात आहेत. सराफ पेढ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स फलकांवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर प्रदर्शित केले जात आहेत. अर्थात दरात 500 रुपयाहून अधिक फरक पडला, तरच दरात बदल केला जातो. सांगलीची सुवर्ण बाजारपेठ ही विश्वासार्ह आणि कलाकुसरीच्या दागिन्यांसाठी प्रसिध्द. येथील दागिन्यांना सुमारे पावणेदोनशे वर्षाची परंपरा आहे. यामुळे उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी ग्राहक सणसुदीच्या वेळी आणि लग्नसराईत सांगलीला सोन्याचे दागिने खरेदीसाठी येतात.

18 व 14 कॅरेट दागिन्यांमध्ये सोन्याचे प्रमाण कमी असते. त्यात इतर धातू मिसळलेले असतात. ते कमी खर्चिक आणि जास्त टिकाऊ असते. ते दागिन्यांच्या निर्मितीसाठी अधिक लोकप्रिय ठरत आहे. 18 व 14 कॅरेट सोन्यामध्ये शुद्ध सोन्याचे प्रमाण कमी आणि त्यात तांबे, चांदी किंवा जस्त यासारखे इतर धातू मिसळलेले असतात. यामुळे या दागिन्यांची किंमत कमी होते. दागिन्यांमध्ये इतर धातूंचे मिश्रण असल्याने ते अधिक टिकाऊ असतात, त्यामुळे ते रोजच्या वापरातील दागिन्यांसाठी उत्तम ठरतात.

1 ऑक्टोबरचा दहा ग्रॅम (तोऴा) सोन्याचा दर

24 कॅरेट : 1,20,922

18 कॅरेट : 90,743

14 कॅरेट :72,500

9 कॅरेट : 42,860

सोन्याचे दर वाढल्याने ग्राहक कमी वजनाच्या, शुद्धतेच्या पण तरीही सुंदर आणि टिकाऊ दागिन्यांकडे वळत आहेत. दर सतत बदलत असल्यामुळे ग्राहक सध्या प्रतिक्षा करीत आहेत. गरजवंत मात्र मागणीच्या तुलनेत 50 टक्केच खरेदी करीत आहेत. सध्या 18, 14 कॅरेटच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे.
सावकार शिराळे सचिव, सांगली जिल्हा सराफ समिती, सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news