Sangli Jewellery Theft: गव्हाणमधून घरातून साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

गव्हाण (ता. तासगाव) धान्याच्या डब्यात ठेवलेले ४ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला
Jewellery Theft
Jewellery Theft(Pudhari Photo)
Published on
Updated on

तासगाव : गव्हाण (ता. तासगाव) धान्याच्या डब्यात ठेवलेले ४ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोहन लक्ष्मण गुरव (वय ३१, रा. गव्हाण, ता. तासगाव) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन गुरव हे कुटुंबीयांसह गव्हाण येथे राहतात. १ ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर घरातील सोन्याचे दागिने धान्याच्या डब्यांमध्ये ठेवले होते. रक्षाबंधनानिमित्त २८ ऑगस्ट रोजी दागिने काढण्यासाठी पाहिले असता ते गायब असल्याचे दिसून आले. सर्वत्र शोध घेऊन आणि नातेवाईकांकडे चौकशी करूनही दागिने न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. २ ते २८ ऑगस्ट या कालावधीत अज्ञाताने घरात शिरून हे दागिने चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चोरीस गेलेल्या मुद्देमालात २० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, २५ ग्रॅमचे गंठन, ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, १० ग्रॅमची चेन आणि अंगठी, फुले, बदाम अशा सोन्याच्या वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news