Sangli Theft Case: गव्हाण येथील घरफोडीचा छडा; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

‘एलसीबी’ची कारवाई; विट्याचा युवक जेरबंद
theft
theftPudhari
Published on
Updated on

​सांगली : तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण येथे दार उघडे असलेल्या घरातून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी विटा येथील एका २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

गव्हाण येथील रहिवासी रोहन लक्ष्मण गुरव यांच्या घरामधून १ ऑगस्ट ते २८ ऑगस्टदरम्यान सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पथक तासगाव हद्दीत गस्त घालत होते.

गस्तीदरम्यान पोलिस अंमलदार सागर टिंगरे, दरिबा बंडगर आणि सतीश माने यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, एक संशयित व्यक्ती तासगाव कॉलेज ते भिलवडी बायपास रस्त्यावरील एमएसईबी कार्यालयासमोर चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तेथे सापळा रचून संशयित सिद्धार्थ संजय गुरव (वय २०, रा. साळशिंगे रोड, विटा, ता. खानापूर) याला ताब्यात घेतले.

त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आले. अधिक चौकशी केली असता त्याने हे दागिने रोहन गुरव यांच्या घरातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news