Sangli Petrol shortage rumor: पेट्रोल, डिझेल संपल्याच्या अफवेने पंपांवर झुंबड

पुरेसा साठा असल्याची प्रशासन, असोसिएशनची माहिती
Sangli Petrol shortage rumor
Sangli Petrol shortage rumorPudhari
Published on
Updated on

सांगली : डिझेल, पेट्रोलचा साठा संपल्याच्या अफवेने शहारातील पेट्रोल पंपांवर काल सायंकाळी वाहनधारकांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी झुंबड उडाली होती. वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात वाहनात इंधन भरण्यास प्रारंभ केल्याने अनेक पेट्रोल पंपामधील इंधन संपले. यामुळे पंप बंद करावे लागले.

सांगलीत सायंकाळी पाचनंतर पेट्रोल, डिझेलचा साठा संपण्याच्या मार्गावर असल्याची अफवा पसरली. त्यामुळे स्टेशन चौक, माधवनगर रोड, मार्केट यार्ड येथील पेट्रोल पंपावर दुचाकी, कारचालकांनी मोठी गर्दी केली.

अफवांमुळे इंधन संपले

पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे सांगली जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, जिल्ह्यात नेहमीप्रमाणे पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा आहे. कंपन्यांनी सध्या उधारीवर इंधन देणे बंद केल्याने पंपधारकांनी गरजेप्रमाणेच खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी अडचणी येत आहेत. जिल्ह्यात सध्या 256 पेट्रोल पंप कार्यरत आहेत. सायंकाळी मागणी वाढल्याने तीसहून अधिक पंप लवकर बंद झाले. यासाठी अफवा कारणीभूत ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news