Sangli Fraud: ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने १५.५० लाख रुपयांची फसवणूक

धुळ्याच्या एकावर पलूस पोलिसांत गुन्हा
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

पलूस : ऊसतोड मजूर पुरवठा करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १५ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत वसंत कांबळे (वय ४६, रा. येळावी, ता. पलूस) यांनी दिलेल्या तक्रारीवरून युवराज शिवा भिल (रा. पळासनेर, ता. शिरपूर, जि. धुळे) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज भिल याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ३० कोयते म्हणजेच ६० ऊसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन फिर्यादी चंद्रकांत कांबळे यांना दिले होते. त्यासाठी भिल याने कांबळे यांच्याकडून टप्प्या-टप्प्याने एकूण १५ लाख ६० हजार रुपये स्वीकारले आणि या व्यवहाराबाबत नोटरी करारही करण्यात आला होता.

मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही भिल याने ऊसतोड मजूर उपलब्ध करून दिले नाहीत आणि घेतलेली रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळे यांनी पलूस पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली होणाऱ्या अशा व्यवहारांमध्ये शेतकरी व ठेकेदारांनी योग्य पडताळणी करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पलूसचे पोलिस सहाय्यक निरीक्षक जयसिंगराव पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news