सांगली : फायनान्स कंपनीची ४ लाख ६७ हजाराची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

सांगली : फायनान्स कंपनीची ४ लाख ६७ हजाराची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल
Published on
Updated on

जत, पुढारी वृत्तसेवा : भारत फायनान्स इन्क्लुजन शाखा जत या कंपनी अंतर्गत असलेल्या बचत गटातील ९ महिलाकडून परस्पर ४ लाख ६७ हजार ४७० रुपयांची मुदतपूर्व कर्जाची वसुली करूनही कंपनीत रक्कम भरणा न केल्याने एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रुपेश रमेश पोतदार ( वय२९, रा. पाल ता. कराड जि. सातारा) असे फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. भारत फायनान्स इन्क्लुजनचे शाखाधिकारी आजिम शेफी शेख यांनी याबाबत जत पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भारत फायनान्शिअल इन्क्लुजन या कंपनीची जत येथे शाखा कार्यरत आहे. ही कंपनी बचत गटांना अंतर्गत कर्ज वाटप करते. तसेच किरकोळ रिकरिंग ठेवी घेतल्या जात आहेत. दरम्यान या कंपनीकडे वसुली कर्मचारी म्हणून रुपेश पोतदार हा काम करत होता. संशयित पोतदारने मार्च २०२१ पासून कंपनीने बचत गटांना दिलेल्या कर्जाची वसुली करत होता. जत तालुक्यातील बचत गटातील ९ महिलाकडून ३५हजार ३०० रुपये व एका महिलेकडून आरडी रक्कम १ हजार ६०० वसूल केली आहे तसेच मुदतपूर्व कर्ज असतानाही बचत गटातील ३९ महिलाकडून ४लाख ४० हजार ५७० असे एकूण ४ लाख ६७ हजार ४७० इतकी रक्कम वसूल केली आहे. परंतु सदरची रक्कम कंपनीत न भरता परस्पर स्वतः घेतली आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अधिक पडताळणी केली असता पोतदार यांना वसूल केलल्या रकमेचा अपहार केल्याचे दिसून आले. कंपनीची फसवणूक केल्याचे पोतदार विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news