Sangli News : पूरनियंत्रण, नालेसफाईसह 650 कोटींची कामे अडकली!

आजची महासभाही होणार तहकूब; आचारसंहितेचा फटका
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on
Updated on

सांगली : पूरनियंत्रण व पाणी निचरा, नालेसफाई, नाट्यगृह बांधकाम यांसह सुमारे 650 कोटी रुपयांची कामे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेत अडकली आहेत. आज, मंगळवार, दि. 19 जून रोजी होणारी महासभाही तहकूब होणार आहे.

विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामावर झाला आहे. पूरनियंत्रण, पाणी निचरा यासाठी 592 कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. निविदेतील तांत्रिक व आर्थिक बाबींचा अहवाल महापालिकेने जागतिक बँकेला पाठवला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर कार्यारंभ आदेश निघेल. मात्र आता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरच कामांचा कार्यारंभ आदेश निघेल.

महापालिका क्षेत्रातील नालेसफाईसाठी वार्षिक एजन्सीवर फुली मारून निविदा मागविण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र आता सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहितेत निविदा प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्यावश्यक बाब म्हणून नालेसफाईची निविदा प्रक्रिया आचारसंहितेतून वगळली जाणार, की वार्षिक एजन्सीद्वारेच नालेसफाई होणार, याकडे लक्ष लागले आहे. हनुमाननगर येथे सुमारे 30 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही निवडणूक आचारसंहितेत अडकली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news